अवैध मटका जुगार अड्डयावर गुन्हे शाखा युनिट ६ चा छापा, एकुण १० लाखांचा मुद्देमल हस्तगत

उरळी देवाची; येथे सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा ६ पथकाने अवैध मटका जुगार धंद्यावर छापा मारून एकूण १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १० लाख २ हजार ४४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१३ इसम व मटका जूगार चालविणाऱ्या मालकाचे २ भागीदार असे एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, उरळी देवाची भागात जयराम ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे काही इसम हे मटका जूगार खेळत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने,मोकळया जागेतील पत्र्याचे शेड मध्ये काही इसम हे मटका जुगार खेळत असल्याची पडताळणी करून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी ९२,०००/- रुपये रोख रकमेसह मटका जुगार खेळण्याचे साहित्य व आरोपींच्या ताब्यातील वाहने असे एकूण १०,०२,४४५/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, १३ इसम व मटका जूगार चालविणाऱ्या मालकाचे २ भागीदार असे एकूण १५ जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, श्री. लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, श्री. गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, ऋषिकेश टिळेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.