अकोल्यात जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या!

अकोला : अकोल्यात एका विद्यार्थ्याची त्याच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या त्याच्या विद्यार्थी मित्रानेच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रतीक लवंगे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी आणि मृत दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. हे दोघेही अकोल्यातील शास्त्रीनगर भागातnभाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होते. ते दोघेही ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोल्यात शिकवणी वर्गासाठी राहत होते.17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि सदर वादातच अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.

अकोला पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. हत्येची घटना 17 जूनच्या रात्री घडली होती. काल (20 जून) या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. दोघेही अतिशय घनिष्ठ मित्र असल्याने घरचेही अगदी निष्काळजी होते. मात्र, या घटनेने दोघांचेही कुटुंबीय पार हादरुन गेले आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.