कौटुंबिक वादातून पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपूर : कौटुंबिक वादातून पतीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काॅलरी परिसरातील शास्त्रीनगर येथे रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आशिष ओमरीक वर्मा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,वेकोलिच्या कामगार परिसरातील शास्त्रीनगर येथील आशिष ओमरीक शर्मा यांचा प्रेमविवाह सहा वर्षापूर्वी त्याच परिसरातील राजीव रतन चिकित्सालयात साफसफाई करणाऱ्या युवतीसोबत झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. विवाहानंतर आशिष हा व्यसनाधीन होऊन पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन मारहाण करायचा. १६ जूनला असाच प्रकार घडला. मात्र हा प्रकार सहन न झाल्याने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून पत्नीने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर ती घरी न जाता आपल्या मैत्रिणीकडे राहत होती. रविवारी सकाळी आशिषने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेच्या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!