दोन गटातील वादातून तरुणावर जीवे घेणा हल्ला ; स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : दोन गटातील वादातून टोळक्याने तरुणावर जीवे घेणा हल्ला करत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली आहे.याप्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सुलतान करीम शेख व अश्पाक मुन्ना शेख या दोघांना अटक केली आहे. तर हसन उर्फ अच्यु रमजान शेख व आलम शेख या दोघावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सौरभ मारुती कसबे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशपाक व सुलतान हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान सर्व एकाच परिसरातील आहेत. दोन गटात वाद आहेत.तर दोन दिवसांपूर्वी रात्री फिर्यादी तरुण हा इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील वाडेकर हॉस्पिटल समोरून जात होता. यावेळी आरोपींनी त्याला पाहिले आणि हा त्यांचे वाद सुरू असणाऱ्या तरुणांसोबत राहत असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली.“हा सुद्धा त्यांच्यातच असतो, याचाही आपण काटा काढू” अशी धमकी देत फिर्यादीच्या दिशेने दगड मारला. हा दगड फिर्यादीच्या नाक आणि डोळे याच्या वर लागला असून फिर्यादी जखमी झाला आहे.

तर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.