पिंपरीत गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक ; १ किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त

पिंपरी चिंचवड :गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना भाटनगर मधून रविवारी (दि. २०) अटक केली. त्याच्याकडून  ४२ हजार ९०० रुपये किमतीचा एक किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

प्रशांत विजय तामचीकर (वय ४६), अशोक दगडू सकट (वय ४५, दोघेही रा. भाटनगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींकडून ४२ हजार ९०० रुपये किमतीचा एक किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.