बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक, 1 पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त ; भोसरी पोलिसाची कामगिरी

पिंपरी चिंचवड : विक्री करण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक  केली आहे. त्यांच्याकडून 34 हजाराचे एक पिस्तूल, 4 काडतुसे व एक मॅक्झिन जप्त केले आहे.ही कारवाई रविवारी (दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी गावातील गावजत्रा मैदान येथे करण्यात आली.

योगेश शिवाजी दाभाडे  (वय, 22), निलेश पुंडलिक चव्हाण  (वय 21), जगदीश बाळू शेळके (वय 21, तिघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी याप्रकरणी भोसरी पोलीसात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी माहितीनुसार, आरोपी हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तिघांनाही पकडले. त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 4 काडतुसे तसेच एक मॅक्झिन  असा 34 हजाराचा माल जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस  आयुक्तालयाच्या हद्दीत 15 ते 28 जून या काळात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही या तिघांना शस्त्र बाळगून नियमांचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.