माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ ; पतीसह सासू आणि दिरावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ही घटना सप्टेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

त्यानुसार पती अकबर मेहबूब तांबोळी (वय २८), दीर ईलाही मेहबूब तांबोळी (वय २८), आणि सासू (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत विवाहिता सासरी नांदत असताना ती घरात व्यवस्थित काम करत नाही, तसेच सोफासेट, टीव्ही माहेरहून आणण्यासाठी, घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी व इतर कारणांसाठी विवाहितेकडे पैशांची वेळोवेळी मागणी केली. किरकोळ कारणावरून त्यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असे, फिर्यादीत नमूद केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.