मोठी बातमी ! उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

पुणे : पुण्यातील उद्योजक आविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या तब्बल 40 कोटी रुपयांचा मालमत्ता एनफोर्समेंट डिरेक्टर अर्थात ईडीने जप्त केल्या आहेत. Fema कायद्याअंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

 

भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कायद्याअंतर्गत ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अविनशान भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये  हॉटेल वेस्टिन- पुणे  हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा  याचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे सासर्‍यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.