रोटरी क्लब ऑफ भिगवन तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण येथील डॉक्टर नर्स याचा सत्कार

भिगवण (नारायण मोरे) :रोटरी क्लब ऑफ भिगवन तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण येथील डॉक्टर नर्स फार्मसिस्ट लॅब टेक्नीशियन व आशा वर्कर यांना योद्धा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ जीवन सरतापे,श्री जाधव आर डी,श्री मोरे ए एस, श्री डोळे आर एम ,श्रीमती दळवी, श्रीमती हाके , श्रीमती मोरे, श्री माने ,श्रीमती पाळंदे ,श्रीमती सुवर्णा टिंगरे ,श्रीमती निकिता जाधव, श्रीमती शीतल गायकवाड ,श्रीमती मोरे एस डी यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक करताना सचिन बोगावत म्हणाले की प्राथमिक आरोग्य केंद्र मधील सर्व स्थापन आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत.

रोटरी क्लब चे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले की कोरणा च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मधील सर्व स्टाफ आपली स्वतःची काळजी घेऊन घरोघरी सर्वे करून आपली सेवा देत होते. निदान होऊन पॉझिटिव आलेले रुग्ण, घरातील नातेवाईक याची सर्व माहिती त्यांना ठेवावी लागत होती ही सर्व जबाबदारी पार पाडत होते अशा अवस्थेत त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.भिगवण रोटरी क्लब तर्फे आम्ही आत्तापर्यंत आपल्या भिगवण कोवीड सेंटरला विविध प्रकारे मदत दिली आहे व अजूनही देत राहू.

यावेळी डॉक्टर अमोल खानावरे म्हणाले की कोवीड मधील पहिल्या व दुसऱ्या लाटेचा जसे सर्वांनी मिळून सामना केला तसेच संभाव्य तिसऱ्या लाटमध्येे लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमात इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी रोटरी क्लबचे सदस्य संजय खाडे,औदुंबर हुलगे,नामदेव कुदळे,अकबर तांबोळी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.