राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक,१५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनास गर्दी करून कोरोणाच्या नियमांचा फज्जा उडवण्या प्रकरणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना शिवाजीनगर पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली.

पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवाजीनगर परिसरातील डेंगळे पूल येथील धनश्री अपार्टमेंट येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (१९ जून) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यास आदेश धुडकावून पक्ष कार्यकर्त्यांनी गर्दी करून शक्तीप्रदर्शन केले होते. कार्यक्रमस्थळी ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी मास्क चा वापर केला नसुन सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्याचा प्रकरणात जगताप यांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष महेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांच्यासह १०० ते १५० जणांविरोधात आदेश धुडकावणे (भादंवि १८८), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र कोविड उपाययोजना २०२० या कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.