खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या टायगर ग्रुपच्या जिल्हाध्यक्षाला अटक, पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी चिंचवड : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी चिंचवड मध्ये अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा टायगर ग्रुपचा रायगड जिल्हाध्यक्ष असून मागील वर्षी नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो फरार होता.

निलेश रमेश चव्हाण (वय 30, रा. साक्षी पार्क -2 मालेवाडी स्टॉप, सुकापुर ता. पनवेल, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी निलेश चव्हाण हा चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटी समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.