गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फार्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी संजय विलास होनराव (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुंकड यांच्या फर्मचे कल्याणीनगर भागात ऑफिस आहे. फिर्यादी हे अमित लुंकड यांना भेटले असता त्यांनी गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे लुंकड रिऍलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी एकूण 21 लाख 26 हजार 875 रुपये भरले. परंतु लुंकड रियालिटी फर्म कडून होनराव यांना पंधरा टक्के परतावा न देता त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करतात सोमवारी रात्री अमित लुंकड यांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.