जाणून घ्या सायबर क्राईम मधील सेक्सटोर्शन म्हणजे काय?

मुंबई : जसे डिजिटलाझेशन वाढत आहे, तस तसे सायबर गुन्हेगार देखील बोकाळले आहेत. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळ्या प्रकारचा सायबर गुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे सेक्सटोर्शन.

तर आपण आज जाणून घेणार आहोत सेक्सटोर्शन म्हणजे काय आणि या पासून कशी काळजी घेता येईल

सेक्सटोर्शन म्हणजे काय ?

★ फेसबुकवर अज्ञात महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट येते !
★ फेसबुकवर ओळख वाढवून व्हाट्सअप क्रमांक घेऊन
अनोळखी महिला अश्लील चॅट करते.
★ अनोळखी फेसबुक मैत्रीण तिचा स्वतःचा न्यूड व्हिडीओ
व्हाट्सपकॉल वर दाखवते व आपणास व्हिडिओ कॉल वर
न्यूड होण्यास सांगते.
★ आपण केलेला न्यूड व्हिडिओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डीग
करून आपणास पाठवून आपल्या फेसबुक फ्रेंड व युट्युब
ला अपलोड करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली
जाते.

काळजी काय घ्याल?

★ अनोळखी महिलेची fecebook फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
* फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यास अश्लील चॅट करू नका.
★ आपले खाजगी फोटो किंवा व्हिडिओ कोणालाही
शेअर करू नका तसेच न्यूड व्हिडिओ कॉल करू नका

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.