खळबळजनक ! भर बाजारातच चाकूने सपासप वार करत पत्नीचा खून

जळगाव : पत्नीच्या माहेरी जावून कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गल्लीतच चाकूने सपासप वार करुन तिचा खून केला. त्यानंतर पत्नीच्या घरी जावून शालकावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजता पाळधी येथे घडली.याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पूजा सुनील पवार (वय २६ रा. शिवाजीनगर) हिचा मृत्यू झाला आहे तर शालक शंकर भिका चव्हाण (वय २० रा. पाळधी, मातंगवाडा) हा गंभीर जखमी झाला. तर सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव)असे आरोपी पतीचे नाव आहे.

पत्नीच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पती सुनील पवार हा सतत पत्नी पूजा हिच्यावर संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती. पूजाचं माहेर पाळधी येथील मारवाडी गल्लीत होतं. तर सासर गेंदालाल मिल येथे होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी  होती.

दरम्यान मंगळवारी देखील पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते.त्यानंतर हा खून करण्यासाठी सुनील याने बाजारातून चाकू घेतला. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच त्याने तिच्यावर चाकूने सपासप सात वार करुन खून केला तर शालक  शंकर भिका चव्हाण याच्या छातीत चाकू खुपसून जखमी केले. त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. खून केल्यावर गावातच फिरुन दशहत माजविणार्‍या पती सुनील  पवार यास ग्रामस्थांनी पकडून पाळधी पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.त्याची पाळधी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. . या घटनेमुळे पाळधीत खळबळ उडाली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.