झोमॅटो,स्वीगीची डिलिव्हरी करतानाच सोनसाखळ्या चोरणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पुणे परिसरात फूड पार्सलच्या नावाखाली उच्चभ्रू सोसायटीसह रस्त्यावरील जेष्ठ महिलांवर पाळत ठेऊन सोनसाखळी हिसकाविणाऱ्या झोमॅटो आणि स्वीगी डिलीव्हरी बॉयसह तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून सव्वा लाख रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळीसह दुचाकी असा  1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आकाश सिद्धलिंग जाधव (वय 23, रा. शिंदेवस्ती, हडपसर), विजय जगन्नाथ पोसा (वय 22, रा. खराडी) आणि साहिल अनिल गायकवाड (वय 22, रा. सावरखेड, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  याप्रकरणी भारती विठ्ठल भाडळे (वय 60) यानी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारती भाडळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन्ही पाणी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याबाबत तक्रार दिली होती.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. हा गुन्हा घडला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता तिघांनी या महिलेचा पाठलाग करून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.तसेच आरोपींनी त्यांच्या गाडीवर झोमॅटो डिलिव्हरीची बॅग लावलेली असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी या परिसरातील पाचशेहून अधिक सीसीटीवी पुढील तपासले असता आरोपी दुचाकीने चंदननगर, खराडी पर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी शेवाळवाडी परिसरात सापळा रचून वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सुरुवातीला त्यांनी झोमॅटोची डिलिव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिप या सोसायटीमध्ये गेल्यानंतर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. हा गुन्हा केल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारे सोनसाखळी चोरीचा गुन्हा केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहे .

सदरची कामगिरी ही .नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.