पिंपरी चिंचवड : मांडूळाची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
पिंपरी चिंचवड :अंधश्रद्धेपोटी बाळगलेल्या मांडूळाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला आहे.
विक्रीसाठी आणलेले मांडूळ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. इंद्रायणीनगर भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
योगेश मारेआप्प म्हेत्रे (वय 21, रा. आनंद नगर, चिंचवड), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वनविभागाचे वनरक्षक असलेले सुरेश काशिनाथ बरले (वय 30, रा. भांबुर्डा, गोखले नगर, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मांडूळ जातीचा सरपटणारा प्राणी विनापरवाना विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याकडे 15 लाख रुपये किंमतीचे मांडूळ मिळून आले. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!