पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत ५ किलो गांजा जप्त

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक करून त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किंमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शिवराज काशीनाथ बक्के ( वय ३९, रा, उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पुणे – सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर आले होते. त्याठिकाणी बक्के हा हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेऊन थांबलेला दिसला. त्याच्या हालचाली पथकास संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडे पाहताच तो घाई – घाईने निघून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्याच क्षणी संशयावरून पोलिसांनी त्याला जागीच पकडले.

दरम्यान, पोलिसांनी त्याच्याजवळील पांढऱ्या नायलॉन पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडला.वजन केले असता, १ लाख १० हजार रुपये किंमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा असल्याचे निष्पन्न झाले.सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून.
आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.