रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाची आत्महत्या

पुणे : रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानी सध्या राहत असलेल्या किकवी (ता. भोर) येथील त्यांच्या घरामध्ये हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

रज्जाक महंमद मणेरी (वय २५, मूळ रा. बावडा ता. इंदापूर,पुणे) असे या तरुण पोलीस शिपायाचे नाव आहे. या बाबत रज्जाक मणेरी यांचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते. त्यामुळे त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी खिडकीतून काठीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहीले होते.दरम्यान, ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राजगड पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सहकाऱ्यांना या घटनेचा मोठ्ठा धक्का बसला. कामात अत्यंत हुशार व तडफदार असलेल्या रज्जाक यांनी असे काही केले आहे, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

दरम्यान याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सध्या या घटनेचा संपूर्ण तपास सुरु आहे. मात्र रज्जाक मणेरी या तरुण पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.