विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक ; भोसरी पोलिसाची कामगिरी

पिंपरी चिंचवड : विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून एक पिस्तूल मॅक्झीनसह व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.ही कारवाई भोसरी येथे गुळवे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मंगळवारी (दि.२२)रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शशिकांत हनुमंत बॅगरी (वय २२, रा. आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे विनापरवाना शस्त्र असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपये किंमतीचे एक पिस्तूल मॅक्झिनसह तीन जिवंत काडतुसे जप्त केली. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.