केंद्र सरकारच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तपशीलाचा फलक लावण्याची भाजपची मागणी

 

वाघोली : केंद्र सरकारच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तपशीलाचा फलक लावण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले, या प्रसंगी पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश तात्याबा सातव व हवेली तालुका क्रीडा आघाडी विजय अनिलराव जाचक यांच्यां वतीने मागणी करण्यात आली की, पूर्ण देशामध्ये भारत सरकार द्वारे मोफत लसीकरण अभियान गेले चार महिन्यापासून चालू करण्यात आले असुनही अद्याप माहिती फलक नाही. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी लसीकरण केंद्रामध्ये केंद्र सरकारच्या मोफत लसीकरण अभियानाची रीतसर माहिती व पोस्टर्स लावण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे.तसेच आव्हळवाडी येथे लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करावे अशीही मागणी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.