पुणे : कौटुंबिक वादातून हातात तलावर घेऊन मोठ्या भावाला मारहाण

पुणे : कौटुंबिक वादातून छोट्या भावाने हातात तलावर घेऊन मोठ्या भावाला मारहाण केली. त्याशिवाय भांडण सोडविण्यासाठी आलेल्या घरातील इतर लोकांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून साहित्याची तोडफोड केली.ही घटना रामनगर  येथे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात छोट्या भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतीन हकीम सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शौकीन हकीम सय्यद (वय ३४,रामटेकडी हडपसर) यांनी  फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मतीन हा फिर्यादी शौकीनचा लहान भाऊ आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हातात तलवार घेऊन तो जबरदस्तीने शौकीत यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा गळा दाबला.  त्याला प्रतिकार करत असताना, मतीनने त्यांच्या हाताचा चावा घेतला.

हा प्रकार पाहून घरातील इतर लोक वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपीने त्यांनाही लाथुबुक्यांनी मारहाण करून घरातील साहत्याची तोडपोड केली. परिसरातील नागरिकांनी मदत करु नये म्हणून तलवार घेऊन दहशत निर्माण केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.