धक्कादायक! तळवडेत सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू ; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील तळवडे येथे दोन सख्ख्या भावांचा गावाजवळ असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल (गुरुवारी) घडली. ते आजीच्या दशक्रियेनिमित्ताने गावी आले होते.सतीश दत्तात्रय हगवणे (वय 18) व सिद्धेश दत्तात्रय हगवणे (वय 16) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,सतीश व सिद्धेश दत्तात्रय हगवणे हे नवलाख उंबरे येथून तळवडे येथे आजी सीताबाई रघुनाथ हगवणे यांच्या दशक्रियेनिमित्ताने आई वडिलांसोबत तळवडे येथे आले होते.दशक्रिया विधी कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सतीश आणि सिद्धेश येथील मुकाई पाझर तलावात आंघोळीसाठी गेले; मात्र तलावातील पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ते बुडत असताना येथे कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलेने पाहिले.तिने आरडाओरडा केला. काही गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी तातडीने तेथे जाऊन बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना पाइट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तोपर्यत उशीर झाला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.