माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी;माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तसेच इतर कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत कासारवाडी, पुणे, मनमाड नाशिक आणि बंगळुरू येथे घडली.

पती अक्षय राजेंद्र सरोदे (वय २६), सासरे राजेंद्र राजाराम सरोदे (वय ५२) आणि एक महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून पीडित विवाहितेकडे पतीच्या कोर्ससाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच वेळोवेळी घर खर्च करण्यासाठी,बंगळुरू येथे जाण्या-येण्यासाठी पैशांची मागणी केली. ‘तुला घरातील कामी येत नाही. तु चांगली नाही. तुझ्या पेक्षा जास्त हुंडा देणारी मुलगी भेटणार आहे’, असे म्हणून लग्नात सात लाख रुपये, एक फ्लॅट, टुव्हीलर व दागिन्यांची मागणी केली. तसेच हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.