चक्क निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मागितली ९१ लाखाची खंडणी, आरोपी गजाआड
पुणे; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या ताबेमारी करून ताबा परत सोडून सेटलमेंट करण्यासाठी ९१ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पापा इनामदार टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकाला अटक करण्यात आली आहे.
मुसा कमरुद्दिन इनामदार (वय ४०) याला अटक केली तर पापा नबी इनामदार, रूपचंद भिमाजी गजरे, रफीक इनामदार, अयाज अब्दुल रहमान शेख या गुंडा विरोधात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात फिर्यादी यांची ९१ गुंठे जागा आहे. अटकेत असलेला आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी या जागेवर अवैधरीत्या ताबेमारी केली होती. त्यानंतर ताबा सोडण्यासाठी आणि सेटलमेंट करून देण्यासाठी पापा इनामदार टोळीने फिर्यादी यांच्याकडे ९१ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. फिर्यादीने पोलिसांना याची माहिती होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली.
अधिक तपासानंतर आरोपींनी अशाप्रकारे कोंढवा आणि येवलेवाडी परिसरात अनेक ठिकाणी ताबे मारून जुना नकाशा व नवीन नकाशा असा घोळ घालून अनेक लोकांकडून स्वस्तामध्ये जमिनी घेतल्याचा संशय आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण पोलीस कर्मचारी संपत अवचरे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सूर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुखे आणि इतर कर्मचाऱ्यांनी यांनी केली आहे
गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!