अनाधिकृत टपऱ्यांसह पत्राशेडवर कारवाई,गवळीमाथा येथील १४ अनधिकृत टप-या व पत्राशेड निष्कासित

भोसरी; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने प्रभाग कामंक ८ मधील गवळीमाथा येथील अनुकुल चौक येथे १४ अनधिकृत टप-या व पत्राशेड निष्कासित करण्यात आल्या आहेत.

या पथकामध्ये क क्षेत्रिय कार्यालय व इ क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण पथकाचे अतिक्रमण निरिक्षक बाळासाहेब कार्ले, अतिक्रमण निरिक्षक काळे एल.एम. व बीट निरिक्षक शिरसाट एस.डी यांच्यासह १० अतिक्रमण मजूर,२० पोलिस कर्मचारी, १५ होमगार्ड व २ जेसीबी, इतर यंत्रसामुग्रीच्या मदतीने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.

शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व अतिक्रमण पथकाच्या झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार क क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे व भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदिप पाटील, पोलिस निरिक्षक जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक घिघे, रत्नपारखी यांच्या पथकाने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.