चोरट्याने चक्क स्वतः राहात असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली,आरोपीवर गुन्हा दाखल

दत्तवाडी; स्वतः राहात असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त करण्यात आली असुन, याशिवाय शहराच्या विविध भागातही त्यांनी अशाच प्रकार चोऱ्या केल्या असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अक्षय दिपक पाठक (वय २६ रा.दत्तवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार, खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी पुणे शहर आणि परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दत्तवाडी परिसरात एक व्यक्ती चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेउन चोकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय पाठक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी केलेले पाच गुन्हे दाखल आहेत. शहरातील दररोज वाहनांची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबसे, मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे,गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने केली आहे.

पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.