सर्रास चोरट्यांनी पेट्रोल पंप मॅनेजरला लुबाडले,आरोपींकडून नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर मोक्का कारवाई

पुणे;पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी निघालेल्या मॅनेजरला भरदिवसा लुबाडण्याचा प्रकार १४ जून रोजी घडला होता.

आरोपींनी भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून ही रक्कम लुटून नेली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत यातील आरोपींना अटक करून जवळपास नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला होता. यातील सहा आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.

अरबाज नवाब पठाण (वय १९), तालीम आस मोहम्मद खान (वय २०), उबेद अन्सार खान (वय ३०), प्रज्योत कानिफनाथ झांबरे (वय २०), अजीम उर्फ आंट्या मोहम्मद हुसेन शेख (वय २२) आणि शाहरुख ऊर्फ अटी रहीम शेख अशी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजर बाळासाहेब अंभोरे पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होते. त्यानंतर आरोपींनी त्यांना भर रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याजवळील आठ लाख ७४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेचे पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना सर्व आरोपींना अटक केली होती. दरम्यान यातील आरोपी अरबाज खान, तालीम आसमोहम्मद खान आणि अरबाज पठाण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या सर्वांनी केलेले गुन्हे पाहून त्यांच्या विरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सादर केला असुन,अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या प्रस्तावाची पाहणी करून मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.