खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन सख्ये भाऊ जेरबंद,गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

पुणे;खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सख्या भावांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

जुल्फीकार नजीर शेख (वय-३२, रा. १६१, रविवार पेठ, पुणे) व मुस्तफा नजीर शेख (वय- २७) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शनिवार (दि.२६) दरोडा व चाहनचोरी पथकाच्या पोलिसांना माहिती मिळाली की,फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ९७/२०२१, ‘भादंवि कलम ३०७,३२४, ३२३,१४३, १४४,१४६, १४७, १४८,१४९,५०६ व महा पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ या गंभीर गुन्ह्यातील फारार आरोपी शुक्रवार पेठ, पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने वरील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकरीता फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त. डॉ, रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे श्री.श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री. सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक , गुन्हे शाखा, पुणे शहर, सपोफौ शाहिद शेख, पोना अतुल मेंगे, पोना धनंजय ताजणे, पोना गणेश पाटोळे, पोना प्रमोद मोहिते, पोना मॅगी जाधव व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, दरोडा व वाहनचोरी विरोधी
पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.