महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर संघटने चा भा ज पा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला जाहीर पाठिंबा

पिंपरी चिंचवड;नाभीक समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव चक्का जाम आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.पंकजाताई मुंडे राष्ट्रीय सचिव भाजपा व आमदार महेश लांडगे,आमदार लक्ष्मण जगताप, अमित गोरखे सचिव महाराष्ट्र राज्य भाजपा यांना नाभिक समाजाच्या प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले.

१)नाभिक समाजाच्या 29 समाज बांधवांनी लॉक डाऊन काळात आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.

२) केशशिल्पी बोर्ड व नाभिक महामंडळ पुनर्गठित करावे या साठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा.

३) स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाभिक समाजास योग्य ते प्रतिनिधित्व भा ज पा ने येणाऱ्या निवडणुकीत द्यावे.

४) पिंपरी चिंचवड महानगपालिकेने आर्थिक दुर्बल घटकासाठीची आर्थिक मदत ३००० रुपये हे तात्काळ देण्यात यावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थे मधील आरक्षण पूर्ववत करावे. यासाठी नाभिक समाज बांधव आपल्या बरोबर रस्त्यावर येऊन या पुढे प्रखर आंदोलन करेल व आजच्या या आरक्षण बचाव आंदोलनाला संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

प्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महापौर माई ढोरे गट नेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे मा.अध्यक्ष प्राधिकरण अमोल थोरात राजु दुर्गे मोरेश्वर शेडगे सरचिटणीस राजेश पिल्ले नगरसेवक कुंदन गायकवाड विकास डोळस. बाबू नायर माउली थोरात केशव घोळवे माजी महापौर राहुल जाधव ,नितीन काळजे मा. स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सीमाताई सावळे, आशाताई शेंडगे नगरसेविका भाऊसाहेब रासकर अध्यक्ष ओबीसी मोर्चा कैलास सानप, गणेश ढाकणे मनोज ब्रम्हांनकर, वैशाली खाडे नगरसेविका शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, कार्याध्यक्ष गणेश शिंदे,विशाल वाळुंजकर सदस्य रेल्वे बोर्ड,उपाध्यक्ष अशोक पंडीत, समाधान गवळी, संतोष भालेकर, मयुर आढाव, युवा कार्यकर्ते शिवाजी चित्ते, श्रीकांत गायकवाड, जीवन हेमाडे,साई ठाकरे, अमोल, श्री मंगले माऊली गायके,योगेश मोरे चिटणीस, विभाग अध्यक्ष नितीन कुटे, भोसरी,संदिप महाले, वाल्हेकर चिंचवड वाडी चिंचवड शंकर गायकवाड मोशी विभाग अध्यक्ष संदिप दळवी, बोपखेल विभाग अध्यक्ष कासारवाडी, पिंपरी कार्य सदस्य राम रतन जाधव, युवा अध्यक्ष पंकज व्यवहारे, सिधाराम मुळे, वाल्मिक काटे, प्रसिध्दी प्रमुख तिरुपती सावरकर, जितेन्द्र चित्ते,अमोल जाधव, पंकज बनाईत,गुरु धायरे, इत्यादी पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.