विभक्त राहणाऱ्या पतीनेच केला पत्नीचा विनयभंग,आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल

दापोडी; विभक्त राहणाऱ्या पतीने पत्नीला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला. दापोडी मध्ये २७ मे २०२१ रोजी व त्यानंतर वेळोवेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अनिल पंडित (वय ४५, रा. धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला पती- पत्नी असून ते वेगवेगळे राहत असून, आरोपी पतीने पत्नीच्या मोबाईलवर वारंवार अश्लील मेसेज पाठवले. पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा कदम करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.