लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे दोन आरोपी गजाआड,५ पीडित महिलांची सुटका

चाकण; लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे दोन आरोपी गजाआड,
चाकण पोलिसांनी आरोपीस अटक केली, तसेच पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. चाकण येथील साईदीप हॉटेल अॅन्ड लॉज याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

शहाजी देवीदास शिंगाडे (वय ३१, रा. कुरुळे, खेड, पुणे मुळगाव – सोलापूर) व नवनाथ मधुकर निकम (वय २५, रा. कुरुळे, खेड, पुणे मुळगाव-लातूर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, जगन्नाथ शंकर करटे (वय ७४, रा. चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्थिक अडचणीत असुन त्याच्या फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होते. चाकण पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली तसेच, २४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.