तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलय?एकदा खात्री करून घ्या!
जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं असेल तर तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून तुमचं स्टेटस तापसून पाहू शकता.
यासाठी तुम्हाला सर्व प्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर त्या ठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा.
आपलं स्टेटस पाहण्यासाठी हायपर लिंक Click Here वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार आणि पॅन कार्डाची माहिती भरावी लागेल. जर तुमचं पॅन आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला your PAN is linked to Aadhaar Number हा मेसेज दिसेल.
जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक होईल. एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.
त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक जाईल. यानंतर तुम्हाला https://www1.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक केल्यानंतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!