माहेरून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ,आरोपी पातीवर गुन्हा दाखल
दापोडी; घर बांधण्यासाठी भावाकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयराज जेविअर मुदलीयार (वय ४८, रा.शंकर काची चाळ, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती विजयराज हा वारंवार फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे. तुझ्या माहेरच्यांनी मला काही दिले नाही. एकदा फक्त थ्री व्हीलरला पैसे दिले आहेत. आता दापोडी येथे घर बांधण्यासाठी भावाकडून दोन लाख रुपये आण, असे म्हणत वेळोवेळी फिर्यादी यांचा छळ करत असुन, त्यांना उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!