भिशी लावल्याने फायदा होईल असे आमिष दाखवत, महिलेला २४ लाखांना घातला गंडा
खडकी; भिशीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगून पैसे गुंतवण्यास भाग पाडून एका महिलेची तब्बल २३ लाख ७४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. बोपोडीत हा प्रकार घडला असून खडकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेलुकूलम दामोदरन श्रीनिवासन, सीमा मेलुकूलम श्रीनिवासन, वरून मेलुकूलम श्रीनिवासन (सर्व रा केरळ) आरोपीवरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्योती पंकज अगरवाल (वय ४७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला भिशीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या आमिषाला बळी पडून फिर्यादीने २०१५ पासून तब्बल ४७ लाख ४९ हजार ९९८ रुपये आरोपीला दिले. परंतु आरोपींनी त्यातील काही रक्कम परत केली आणि २३ लाख ७४ हजार ९९९ रुपये परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली आणि कुठेतरी पळून गेले आहेत.
खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!