सर्वेचे काम करत असलेल्या तरुणाचा दुचाकी स्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी; सर्व्हेचे काम करीत असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. भोसरी परिसरात ही घटना घडली.

ऋतिक बाळासाहेब धुमाळ (वय २१, रा. अतुल नगर, वारजे-माळवाडी, पुणे) यांनी शनिवारी (दि. २६) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी धुमाळ हे भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृह जवळ रस्त्यावर ब्रिजखाली सर्वेचे काम करीत असताना, त्यावेळी ऑरेंज रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या २० ते २२ वयोगटातील दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. आरोपी फरार असुन,

पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.