दरवाजा उघडा ठेवण पडलं महागात, चोरटयांनी २ लाखांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम केली लंपास

पिंपरी; दरवाजा उघडा बघताच प्रवेश करून चोरट्यांनी एक लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना पिंपरीगाव येथे घडली.

केतन अशोक नांगरे (वय ३३, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, तपोवन मंदिराजवळ, पिंपरीगाव) यांनी शनिवारी (दि. २६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास फिर्यादी नांगरे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी संधी साधुन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ९९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.