अट्टल गुन्हेगार गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक,हवेली पोलिसांची कामगिरी

खडकवासला; अंमली पदार्थ विक्री करणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून खडकवासला येथून गावठी पिस्तूल व एका जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे.

शिवम आनंत बरिदे (वय २१, रा.खडकवासला ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना शिवम बरिदे या सराईत गुन्हेगाराकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली असता, मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर खडकवासला परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून आरोपी बरिदे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. आरोपी शिवम बरिदे यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.