घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी!३० सप्टेंबरपर्यंत मिळणार गुंतवणूकीवरील करात सूट

नवी दिल्ली; कोरोना महामारीमुळे देशभरात करदात्यांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता, केंद्र सरकारने निवासी घरांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील कर कपातीसाठी क्लेम करण्याची मुदत वाढविली आहे. गुंतवणूकीची अंतिम मुदत ३०जून २०२१ ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याद्वारे १ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर घर खरेदी करणारे लोक कर सूटसाठी दावा करु शकतात. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. कर कपातीसाठी निवासी घरात ही गुंतवणूक करण्याची मुदत पूर्वीच्या ३० जून २०२१ च्या मुदतीत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.

वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे, कलम ५४ ते ५४ जीबी अंतर्गत समाविष्ट असलेल्या गुंतवणूक, ठेवी, देयके, अधिग्रहण, खरेदी, बांधकाम किंवा अशा इतर गोष्टींसाठी करदात्यांनी केलेल्या दाव्यांसाठी कर कपातीपासून सूट देण्यात आली आहे. यामध्ये, क्लेमची अंतिम तारीख आता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मालमत्ता खरेदी किंवा बांधकाम केल्यावर सूट
आयकर कायदा १९६२ च्या कलम ५४ आणि कलम ५४ जीबी नुसार निवासी मालमत्ता विकत घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी नव्याने गुंतवणूक केल्यास आपण निवासी मालमत्ता विक्री केल्यावर भांडवली नफ्यात तुम्हाला कर सूट मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम ५४ जीबी अंतर्गत, आपण एखाद्या पात्र कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या वर्गणीसाठी रक्कम गुंतविल्यास निवासी मालमत्तेच्या हस्तांतरणास प्राप्त झालेल्या भांडवलाच्या नफ्यातून सूट दिली जाईल.

२ कोटींपेक्षा कमी मालमत्तां असेल तर लाभ मिळू शकतो
केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ ने कलम ५४ अंतर्गत भांडवली नफ्यातील सूट मर्यादा वाढविली होती. त्याअंतर्गत आता दोन निवासी घरे खरेदी करण्यास किंवा बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, मालमत्तेचे मूल्य २ कोटींपेक्षा कमी असेल तरच कर सवलत मिळेल. करदाता केवळ एकदाच हा पर्याय वापरू शकतो. यापूर्वी केवळ एक खरेदी किंवा उत्पादनास परवानगी होती.

विवाद से विश्वास या योजनेची मुदतदेखील वाढविण्यात आली आहे
शासनाने चालवलेल्या विवद से विश्वास योजनेंतर्गत विना व्याज परतफेड करण्याची अंतिम मुदतदेखील वाढविण्यात आली आहे.पूर्वी ती ३० जूनपर्यंत होती. आता ही २ ऑगस्टपासून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात आले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.