मौज-मजे साठी मोटार सायकल चोरी करणारा चोरटा गजाआड, गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे; मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ८ मोटार सायकल हस्तगत करत ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे.

शाहवेज शहजाद अन्सारी (वय २५, रा. सध्या इंग्लीश बेकरी, शिवाजी मार्केट कॅम्प पुणे. मुळ रा.मोहल्ला सय्यदवाडा, नगिना बिजनोर राज्य उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकवणे यांना माहिती मिळाली की,
नमूद गुन्हयातील मोटार सायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार हा कॅम्प परिसरामध्ये फिरत आहे. सदरची माहिती श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ६ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीस अटक केली. आरोपींकडे चौकशी केली असता त्याने मौजमजेसाठी ८ मोटार सायकल चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ८ मोटार सायकल हस्तगत केल्या.तसेच आरोपीविोधात ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले.आरोपीस अटक करून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री अशोक मोराळे, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.