शाळेतल्या जुन्या मित्राने जवळीक साधून महिलेचा बलात्कारचा व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वर केला व्हायरल,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;अनेक वर्षांनी ओळख झाल्यानंतर शाळेतल्या मित्रांनी एका चाळीस वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ काढत तो व्हिडिओ शाळेतील मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकला. सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

उमेश असुलाल डांगी (वय ४०, रा. शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादवी कलम 376 (2) (एन) 506 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला शालेय शिक्षणासाठी एकाच शाळेत होते. २०१९ मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी मेळावा निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा ओळख झाली. यावेळी शाळेतील सर्व मित्रमैत्रिणीनी मिळून एक व्हाट्सएप ग्रुपही तयार केला होता. यानंतर आरोपीने पीडित महिलेशी जवळीक वाढवली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान या संबंधाचा व्हिडीओ तयार करून त्याने काही दिवसांपूर्वी तो शाळेच्या व्हाट्सएप ग्रुपवर पाठवला. या प्रकारानंतर पीडित महिलेची मित्रपरिवारात बदनामी झाली होती. त्यामुळे त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.