रेशन कार्ड मद्ये नवीन नावे वाढवायची,पहा सविस्तर

मुंबई; रेशन कार्ड हे खासगी कामासह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्रं मानलं जातं. याद्वारे तुम्हाला फक्त स्वस्त किंमतीतील धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. म्हणून त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील नोंदविला जाणे आवश्यक आहे. म्हणजेच जर एखादा नवीन सदस्य तुमच्या घरात सहभागी झाला असेल, जसे की कुटुंबातील एखादं लहान मूल किंवा एखादी नवीन सून, तर त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये जोडणे बंधनकारक आहे.

जाणून घ्या नव्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी काय करावे:

लग्नानंतर कुटुंबात एका नव्या सदस्याचा समावेश होतो. त्या सदस्याला म्हणजेच तुमच्या सूनेला प्रथम तिच्या आधार कार्डमध्ये काही माहिती अपडेट करावी लागेल. म्हणजेच लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला तिच्या आधारकार्ड मध्ये पतीचे नाव अपडेट करावे लागेल. तसेच तिचा पत्ता बदलणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर सुधारित आधार कार्ड प्रतीसह अन्न विभाग अधिकाऱ्यांना द्यावे. त्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अर्ज सादर करावा.

लहान मुलांचे नाव जोडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र:

जर घरात एखादे मूल जन्माला आले असेल तर प्रथम जन्मलेल्या मुलाचे आधार कार्ड बनवावे लागेल. यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल. यानंतर आधार कार्डसाठी नाव नोंदवण्यासाठी अर्ज करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज करायची संपूर्ण प्रक्रिया

या पर्यायी मार्गांनी तुम्हाला कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल. पण तुम्ही नवीन सदस्यांची नावं जोडण्यासाठी घरबसल्याही अर्ज करु शकता. यासाठी आपण आपल्या राज्यातील अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. जर सदस्यांची नावे जोडण्याची सुविधा असेल तर आपण घरी बसून हे काम करू शकता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.