अवैधरित्या देशी विदेशी दारू विकणारे दोन आरोपी गजाआड,सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी
आळंदी; शनिवारी (दि. २६) दुपारी मरकळ येथे अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. यात १ लाख ७ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे.
अमोल जयसिंग काची (वय २७), स्वाती संजय काची (वय ३३, दोघे रा. बागवान वस्ती, मरकळ, ता.खेड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी मरकळ येथील हॉटेल नानाश्री (मच्छी स्पेशल) व्हेज नॉनव्हेज या हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारु व बियरची विक्री करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. त्यात पोलिसांनी ५ हजार ३९० रुपये रोख रक्कम, एक लाख ७ हजार ६३५ रुपयांची देशी, विदेशी दारू असा एकूण एक लाख १३ हजार २५ रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुळे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे सोनाली माने यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!