अल्पवयीन मुलीला वारंवार लग्नाची मागणी करत केला विनयभंग, आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल

चिखली; लग्नासाठी अल्पवयीन मुलीसमोर वारंवार लग्नाचा प्रस्ताव ठेवणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

निर्देश रामराव राठोड (वय २५, रा.राजगुरू पार्क, मोरेवस्ती, चिखली) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आरोपी निर्देशसोबत ओळख आहे. अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांच्या मोबाइलवरून आरोपी निर्देश याच्यासोबत मित्र म्हणून बोलत होती. त्यावेळी आरोपीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, अल्पवयीन मुलीने तो नाकारला. तसेच आरोपी निर्देश सोबत बोलणे बंद केले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या मामाकडे पुढील शिक्षणाकरिता गेली. तिथेही आरोपी गेला व त्याने पुन्हा त्या अल्पवयीन मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यामुळे निर्देश याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.