पोलिस अंमलदाराने सहकार्याकडून घेतली लाच,लाचखाऊ पोलिसाचे निलंबन
पुणे;वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील ड्युटी अंमलदाराने आपल्या सहकार्याकडून पे फोनद्वारे लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी संबंधित ड्युटी अंमलदाराला निलंबित केले आहे. प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलिस शिपायाचे नाव आहे.
पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी या अंमलदाराकडे असते. वारजे माळवाडी येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे याने एका पोलिस शिपायाला जाणून बुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होते.
त्यांना काम शिकायचे असल्यामुळे त्यांनी मजबुरीतून २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पेद्वारे प्रमोद कोकाटे याला लाच दिली.
पोलिस शिपायाने केलेल्या तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलिस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पेद्वारे पाठविल्याचे सांगितले. मात्र, कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे.
त्यानुसार प्रमोद कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे. विनामास्क फिरणार्यांकडून दंड स्वीकारण्यासाठी पुणे पोलिसांनी कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय नव्याने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!