तरुणाला ऑनलाईन सेक्स पडला महागात, तरूणीने नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हजारो रुपये उकळले
पुणे; ऑनलाइन सेक्सच्या मोहजालात अडकवून पुण्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करून या तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणाकडून हजारो रुपये उकळले. आणखी पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर या तरुणाने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सायबर पोलिसांनी अनोळखी तरुणीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण २९ वर्षे वयाचा आहे. फेसबूकवर त्याची संबंधित तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ऑनलाइन सेक्स करण्याचे अमिष दाखवत या तरुणीने त्याचा व्हॉट्सअप नंबर घेतला. त्यावर व्हिडीओ कॉल करून संबंधित तरुणाला कपडे काढण्यास भाग पाडले. आणि त्याचा नग्न व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्डरद्वारे रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हजारो रुपये या कडून उकळले. दरम्यान परत परत पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासला सुरुवात केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!