चंदनाच्या आठ झाडांची चोरी,खडकीच्या दारूगोळा फॅक्टरीतील घटना,अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

खडकी; खडकी परिसरात असलेल्या दारुगोळा फॅक्टरीतून २६ जून रोजी चंदनाची आठ झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी याच परिसरातील बोट क्लब भागातून सात चंदनाच्या झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्याच आठवड्यात दारूगोळा फॅक्टरी परिसरातून ८ झाडे चोरल्याचे समोर आले होते. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शनिवारी (दि. १९) मध्यरात्री घडला आहे. याबाबत पुरुषोत्तम कुमार (वय ५८, रा.रेंजहिल) यांनी तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारूगोळा फॅक्टरीत ज्युनिअर वर्कर मॅनेजर आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दारूगोळा फॅक्टरी च्या परिसरात असलेल्या बोट क्लब भागातून या झाडांची चोरी झाली. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली.

पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.