नगर रस्त्यावरील दुभाजकाचे काम सुरु करा भाजप क्रीडा आघाडी व जनता युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
वाघोली;पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू असून दुभाजक उंची अतिशय कमी झाल्यामुळे वाहनधारकांना छोट्यामोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर दुभाजकाचे काम सुरु करावे अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव व भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. महामार्गावरील दुभाजक व रस्त्याची उंची एकसारखीच झाली आहे. त्यामुळे वाहनधारक अचानक वाटेल येथून घुसखोरी करता अशावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लवकरात लवकर दुभाजकाचे काम सुरु करणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिले असल्याचे भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक यांनी सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!