पोलिस असल्याचे खोटं सांगून कस्टम ऑफिसमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने,५१ लाखाची फसवणूक, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पुणे; पोलीस दलात नोकरीसाठी असल्याचे सांगुन कस्टम ऑफिसमध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखून ५१ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक करणारे सर्राईत दोन आरोपीवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३) आणि सुलोचना दादू सोनवणे (वय ३७) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र शिंदे याने स्वतः पोलिसात नोकरी करत असल्याचे खोटे सांगुन आणि पोलिसांचा गणवेश परिधान करून आरोपिने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.आणि सुलोचना सोनवणे यांच्या मदतीने फिर्यादी यांचा मुलगा, भाचा आणि पुतण्या यांना कस्टम ऑफिस तिथे नोकरी लावून देतो असे आमिष दाखून फिर्यादी कडून ५१ लाख १७ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून

पुढील तपास फरासखाना पोलस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.