नोकरी नाही?आता दहावी पास उमेदवारांनासाठी सुरक्षा दलात भरती

मुंबई;देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असताना, या काळात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक भरती प्रक्रिया देखील लांबणीवर पडल्या आहेत.

अनलॉक दरम्यान अनेक प्रकारच्या शासकीय पदाभार्तीच्या जाहिराती शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर या परीक्षांमध्ये यश संपादन करत शासकीय नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातच आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कॉन्स्टेबलपासून ते मॅकेनिक अशा विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिकृत पत्रक देखील जाहीर झालं असून एकूण ११० जागांवर भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जून २०२१ पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जुलै २०२१ पर्यंत असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर bsf.gov.in भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवारांना वेबसाइटच्याच माध्यमातून अर्ज दाखल करायचा आहे.

नोकरीसाठी लागणारे पद

  • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन (ग्रुप सी पोस्ट)- १ जागा
  • एएसआय प्रयोगशाळा टेक्निशिअन (ग्रुप सी पोस्ट)- २८ जागा
  • सीटी (वॉर्ड बॉय/वॉर्ड गर्ल/ आया) ग्रुप सी पोस्ट- ९ जागा
  • एचसी (वेटरिनरी) ग्रुप सी पोस्ट- २० जागा
  • कॉन्स्टेबल (कॅनलमॅन) ग्रुप सी पोस्ट- १५ जागा
  • एसआय (स्टाफ नर्स)- ३७ जागा

पात्रता
स्टाफ नर्सपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं इयत्ता १२ वी पर्यंतचं शिक्षण व सोबतच नर्सिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणं बंधनकारक आहे.

ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन पदासाठी विज्ञान शाखेतून इयत्ता १२ उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त ऑपरेशन थिएटरचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं असणार आहे.

प्रयोगशाळा टेक्निशिअनसाठी उमेदवाराचं चिकित्सा प्रयोगशाळा प्राद्योगिकीकरणात डिप्लोमा केलेला असणंर गरजेचं आहे. कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराचं किमान इयत्ता १० वीपर्यंतंचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे.

उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक तर ३० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.