अट्टल गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सरराईत गजाआड,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची कामगिरी

पुणे; सहाकार नगर परिसरात अट्टल गुन्हेगाराचा खुन झाला असताना त्याच्या अंतयात्रेत सहभागी झालेल्या सर्राईतास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.अटक झालेल्या आरोपींविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत.

सलमान ऊर्फ सल्ल्या हमीद शेख, (वय- २२, रा. विशाल अपार्टमेंट, पहिला मजला, सिध्दी हॉस्पिटल शेजारी, बालाजीनगर, धनकवडी, पुणे)असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फरारी/मोका/तडीपार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पोलिसांना बातमीदाराकडुन माहिती मिळाली असता, त्या ठिकाणी सापळा रचुन सदर गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपला सहभाग असल्याची कबुली आरोपीने दिली.पुढील कारवाईकरीता सहकारनगर पोलिसांनी आरोपीस पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे श्री.श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री. सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर, सपोनि जुबेर मुजावर, सपोफौ शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोना अतुल मेंगे, पोना धनंजय ताजणे, पोना प्रमोद मोहिते, पोना गणेश ढगे, पोना मॅगी जाधव व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व ऋषिकेश कोळप, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.